रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील बोरखेडा शिवारातील चार जणांच्या क्रूर हत्याकांड प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून सरकारतर्फे या खटल्यात अॅड. उज्ज्वल निकम हे काम पाहणार आहेत.
याबाबत वृत्त असे की, बोरखेडा शिवारात महिताब भिलाल हे पत्नी व पाच मुलांसह मजुरीनिमित्त राहत होते. नातलगाच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी व मोठ्या मुलासोबत ते बाहेरगावी गेले होते. त्यावेळी घरी असलेल्या दोन मुली व दोन मुले अशा चौघा अल्पवयीन भावंडांची हत्या केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली होती. या क्रूर हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मुख्य आरोपी महेंद्र भिलाला (रा.स्वस्तिक टॉकीजमागे, रावेर) याला पोलिसांनी अटक केली होती. यासोबत दोन अल्पवयीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल केले आहे.