सावदा, प्रतिनिधी । सावदा नगर परिषदेचे नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी व त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष असताना पदाचा दुरुपयोग करीत स्वतःच्या घरासाठी वाढी घरपट्टी लागू न करता जुन्या कायद्याप्रमाणेच घरपट्टी लावून ठेवल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र ठरविले होते. याविरोधात राजेंद्र चौधरी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अपील केले असता त्यांच्या अपात्रतेस ‘तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
२०११ ते २०१६ या काळात नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी व त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष असताना त्या काळात नगरपरिषदेणे सावदा येथे ४० टक्के वाढीव घरपट्टी लागू केली. मात्र चौधरी यांनी पदाचा दुरुपयोग करीत स्वतःसाठी जुन्या कायद्याप्रमाणेचे घरपट्टी कायम ठेवली व २०२० पर्यंत त्याच प्रमाणे त्यांनी घरपट्टी भरली असता याविषयी शेतकरी अजय भागवत भारंबे यांनी त्यांच्या विरोधात अपात्रतेचा अर्ज जिल्हाधिकाऱ्याकडे दाखल केला होता. त्याबाबत या अर्जावर सोमवारी ७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भारंबे यांचा अर्ज मंजूर करून सावदा येथील नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना नगरसेवक या पदावरून अपात्र केल्याचे घोषित केले होते.
दरम्यान या आदेशाविरोधात राजेंद्र चौधरी यांनी शासनाकडे अपील केले होते या अपिलानुसार नगर विकास विभाग यांच्याकडून ७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. नगर विकास मंत्री यांच्याकडून पुढील सुनावणी दिनांक वेळ प्राप्त झाल्यानंतर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
याबाबत राजेंद्र चौधरी यांनी भगवान के घर देर है अंधेर नही माझी राजकीय आयुष्याची सुरुवात संघर्षातून झाली आहे. आजही संघर्ष सुरु आहे. भविष्यातही सुरूच राहील. पद असो वा नसो जनतेची कामे करतच राहणार ‘ सत्य परेशान होता है पराजित नही’ अशी भावना व्यक्त केली आहे.