Home Cities जळगाव शिवसेनेतर्फे रावसाहेब दानवे यांचा निषेध (व्हिडिओ)

शिवसेनेतर्फे रावसाहेब दानवे यांचा निषेध (व्हिडिओ)

0
30

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवसेने महानगरतर्फे आज शनिवार १२ डिसेंबर रोजी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वार येथे दानवे यांच्या पुतळ्यास शेण भरवून व बांगड्या भरून जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला.

केंद्राच्या पेट्रोल व डीझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात असल्याचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले. तसेच
देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते. दानवे यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे दानवे यांच्या पुतळ्यास शेण फासून निषेध व्यक्त करण्यात आल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले. तसेच जर शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान व चीनचा हात असेल तर केंद्र सरकाने सर्जिकल स्ट्राईक करावे असे आवाहन श्री. वाघ यांनी दिले. शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ महानगगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जॅकीर पठाण, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, सरिता माळी, मनीषा पाटील, चिंतामण जैत्कर, हेमराज चव्हाण, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, अंकुश कोळी, संजय सांगळे, पूनम राजपूत, ईश्वर राजपूत, जितू साळुंखे, विजय बांदल, इकबाल शेख, शोएब खाटीक, विलास पवार, बाळा कंखरे, निलेश देशमुख ,राजू सोनवणे, कुलकर्णी नाना आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/383916266029090/


Protected Content

Play sound