पुणे वृत्तसंस्था । पुणे शहरातील शिंदेवाडी येथील एका गॅरेजसमोर पार्किंगसाठी उभ्या असलेल्या पाच खासगी बससह २० ते २५ वाहनांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे २ बंब आणि पाण्याचा टँकर घटनास्थळी पोहचला आहे. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.
सकाळी या वाहनांना भीषण आग लागली. चार ते पाच खासगी बससह २० ते २५ वाहनांना आग लागल्याचे स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येतं. धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाचे २ बंब आणि पाण्याचा टँकर घटनास्थळी पोहोचला असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं आहे.