Home Cities धरणगाव पटनी हायस्कूल पाळधी येथे मास्क वाटप

पटनी हायस्कूल पाळधी येथे मास्क वाटप

0
29

 

पाळधी, प्रतिनिधी । येथील मोहम्मद ताहेर पटनी उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शाळेतर्फे मास्क वाटप करून विद्यार्थ्यांना कोरोना काळात कसी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शाळेतर्फे मास्क वाटप प्रसंगी मुख्याध्यापक मुश्ताक करीमी, सईद शाह, इक्बाल खान, अकील अजीज, समरीन कलीम, नईम बिस्मिल्ला, रुबीना खान व जहूर देशपांडे उपस्थित होते. मुख्याध्यापक मुश्ताक करिमी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी सांगितले की कोरोनापासून गाफील राहू नये, कोरोनापासून बचावासाठी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व इतर उपाययोजना उपाययोजनांची माहिती देण्यात आली. शाळेत मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound