१४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. आंबेडकर स्माकाराचं लोकार्पण होईल- मुंडे

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । १४ एप्रिल २०२३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्माकाराचं लोकार्पण होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि इतर मान्यवरांनी दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी आयोजित शासकीय कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी आंबेडकर स्मारकाबाबतची घोषणा केली.

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरही आंबेडकर स्माराकाबाबतची माहिती दिली आहे. “इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून राज्य शासन त्याकडे दैनंदिन पद्धतीने लक्ष ठेवून आहे. एप्रिल २०२३ पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आमच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील”, असं धनजंय मुंडे यांनी म्हटलं आहे.

Protected Content