Home Cities जळगाव अरेच्चा…एकनाथराव खडसे पतसंस्थेत ठेविदारांच्या अडकल्या ठेवी !

अरेच्चा…एकनाथराव खडसे पतसंस्थेत ठेविदारांच्या अडकल्या ठेवी !

0
38


जळगाव : राहूल शिरसाळे । एकनाथराव खडसे यांनी बीएचआर अपहार प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला असून यामुळे सर्व जण त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. मात्र त्यांच्याच नावाने स्थापन करण्यात आलेल्या पतपेढीत ठेविदारांच्या ठेवी अडकून पडल्या असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी आज केला आहे.

आज दीपककुमार गुप्ता यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आज वरणगाव येथील दोन ठेविदारांचा मला फोन आला. यात त्यांनी वरणगाव येथील एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर-शेती सहकारी संस्थेत ठेवी अडकल्या असल्याची माहिती दिली.

एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर-शेती सहकारी संस्था ही दुसर्‍याच संचालकांनी सुरू केली असून याचा नाथाभाऊंशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. यांच्याशी खडसे यांचा थेट संबंध असो वा नसो आपल्याला याच्याशी काही देणे-घेणे नाही. तथापि, आपल्या नावाने पतसंस्था असल्याने खडसे यांनी ठेविदारांना न्याय मिळवू द्यावा अशी मागणी दीपककुमार गुप्ता यांनी याप्रसंगी केली.


Protected Content

Play sound