Home क्राईम उचंदा येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा

उचंदा येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा

0
44
FIR


मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील उचंदा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील उचंदा येथील १६ वषीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने शुक्रवार ४ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुधाकर शेजोळे करीत आहे.


Protected Content

Play sound