जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली शिवारातून ५० हजार रूपये किंमतीचे सागवान लाकडाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या प्रकार गुरूवारी दुपारी उघडकीला आहे. शुक्रवार ४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील रहिवाशी पंडीत रामदास फुसे (वय-४२) यांचे ईलेक्ट्रॉनीकच्या दुकानासह शेतीचे काम करतात. शिरसोली शिवारात गट क्रमांक ६७ मध्ये त्याची शेती आहे. १६ वर्षांपासून शेतात त्यांनी काही सागवान झाडे लावलेले आहे. त्यापैकी ३० फूट लांब असलेले ५० हजार रूपये किंमतीचे एक झाड २ डिसेंबर सकाळी ९ ते ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कुऱ्हाडीने तोडून सागवान चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आहे. याप्रकरणी पंडीत फुसे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.