Home राजकीय उर्मिला मातोंडकर यांनी केले विजयी उमेदवारांचे कौतुक

उर्मिला मातोंडकर यांनी केले विजयी उमेदवारांचे कौतुक

0
54


मुंबई । विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारत भाजपाला धूर चारली आहे. यानंतर नुकत्याच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटद्वारे महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे कौतुक केले आहे. उर्मिला मातोंडकर ट्विट करत म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबत उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे, हे या निकालाने सिद्ध होते, असं उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाकरता महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि सतिश चव्हाण, जयंत आसगांवकर यांचे अभिनंदन, असं ट्विट उर्मला मातोंडकर यांनी केलं आहे.


Protected Content

Play sound