जळगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली सीमेवरील शेतकर्यांच्या आंदोलनाला जळगाव शहर काँग्रेस कमिटीने दिला जाहीर पाठिंबा दिला असून आज दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीरपणे पाठिंबा देण्याकरता आज संपूर्ण राज्यामध्ये एक दिवशीय धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांच्या हिताकरिता रस्त्यावरती उतरलेल्या या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जळगाव शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. जळगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली व एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ उल्हास पाटील, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, ब्लॉक अध्यक्ष नदिम काझी, सुरेश पाटिल, जनार्दन पाटिल, शफी बागवान, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष अमजद पठाण, जिल्हा सचिव जमील शेख, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, मनोज सोनवणे जाकीर बागवान, प्रदीप सोनवणे जगदीश गाडे, विष्णू घोडेस्वार, दीपक सोनवणे, योगेश देशमुख, सुरेंद्र कोल्हे, सागर सपके, युवक शहराध्यक्ष मुजीब पटेल,भाऊसाहेब सोनवणे,परवेज पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.