जळगाव, प्रतिनिधी । सध्या गाजत असलेल्या बी एच आर घोटाळ्याचा सूत्रधार जाहीर करा असे सांगत आज जिल्हा जागृत जन मंचचे अध्यक्ष शिवराम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथरा खडसे यांच्या भूमिकेवरच पत्रकार परिषदेत आक्षेप घेतला आहे. याप्रसंगी सरोज पाटील, नाटेकर, दीपककुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
आपली भूमिका सांगताना शिवराम पाटील म्हणाले कि , बी एच आर मधील अपहार ऑगस्ट २०१५ मध्ये झालेला त्यावेळेस जितेंद्र कंडारे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कंडारे हे सहकार खात्याचे अधिकारी होते, त्यावेळी भाजपच्या मंत्र्याकडे सहकार खाते होते, खडसे यांच्याकडे ११ खात्यांचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते, प्रशासकाची नियुक्ती ही पालकमंत्री यांच्या समंतीने होत असते. याचा पुरावा म्हणजे खासदार रक्षा खडसे यांनी २०१८ मध्ये विशाल जाधवर यांची शिफारस सहकार राज्य मंत्री व केंद्रातील सहकार मंत्री यांच्याकडे केली आहे. बी एच आर मधील अपहारास एकनाथराव खडसे व गुलाबराव पाटील जबाबदार आहेत.
एकनाथराव खडसे यांनी बी एच आर मधील अपहाराचे ६ वर्षानंतर निदर्शनास आणले, यावर आक्षेप घेत बडे मासे असा उल्लेख करून राजकीय सुडाचे कारण आहे सुनील झंवर यांच्या चौकशीत गिरीश महाजन यांचा संबध असेल तर तेपण दोषी सापडतील. खडसे यांनी २०१५ ते २०२० पर्यत अवसायक जितेंद्र कंडारे याकडे का दुर्लक्ष केले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खडसे यांनी बडा मासा म्हणून उल्लेख न करता त्या व्यक्तीचे नाव घ्यावे असे शिवराम पाटील म्हणाले . .
https://www.facebook.com/508992935887325/posts/3405882739531649/