कविता नेतकर यांनी अधिसेविका पदाचा स्विकारला पदभार

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रभारी अधिसेविका (मेट्रन) म्हणून कविता योगेशराज नेतकर यांना मंगळवारी १ डिसेंबर रोजी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी पदभार सोपविला.

नियमित अधीसेविका सविता रेवतीप्रसाद अग्निहोत्री यांनी आपल्या सेवेची ३७ वर्ष पूर्ण करून ३० नोव्हेंबर रोजी त्या नियत वयोमानाप्रमाणे निवृत्त झाल्या. त्यामुळे त्यांच्या जागी प्रभारी अधिसेविका म्हणून कविता नेरकर यांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी मंगळवारी पदभार सोपविला. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी जी. जी. दिघावकर, प्रशासकीय अधिकारी आर. यु. शिरसाठ उपस्थित होते. सविता अग्निहोत्री ह्या १ डिसेंबर १९८३ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात रुजू झाल्या होत्या. तसेच कविता नेतकर या पाठयनिर्देशिका म्हणून १९९८ सालापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवेमध्ये आहेत.

Protected Content