Home क्राईम डी.एल. हिंदी विद्यालयाच्या शिक्षिकेचा विनयभंग; शिक्षकांना मारहाण

डी.एल. हिंदी विद्यालयाच्या शिक्षिकेचा विनयभंग; शिक्षकांना मारहाण

0
39


भुसावळ प्रतिनिधी । शहरातील डी.एल. हिंदी विद्यालयातील तीन शिक्षकांना मारहाण करून एका शिक्षिकेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळातल्या शिवाजीनगर भागात असणार्‍या डी.एल. हिंदी विद्यालयात काल सायंकाळी बाहेरून आलेल्या काही टवाळखोरांनी तीन शिक्षकांना मारहाण केली असून यावेळी एका शिक्षिकेचा विनयभंग करण्यात आला. यानंतर रिक्षातून आलेल्या या टवाळखोरांनी पळ काढला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. बाजारपेठेत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली.

यानंतर या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकामध्य अलताफ कचोरी, अहिरा शेख युनुस, जुनेर फिरोज कुरेशी, बबलू (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरूध्द कलम ३५४, ३९४, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी जुनेर फिरोज कुरेशी या दोघांना अटक करण्यात आली असून इतर जण फरार झाले आहेत. या प्रकरणी पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्थानकाच उपनिरिक्षक गुळीग यांच्यासह प्रशांत चव्हाण, उमेश पाटील, समाधान पाटील, छोटू वैद्य व अंबादास पाथरवट हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound