जळगाव प्रतिनिधी । शहरातील रिंगरोडवरील हरेश्वर नगरातून २० वर्षीय तरूण दीड वर्षांपासून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद आहे. पोलीसांनी बेपत्ता तरूणाला गुजरात येथून घेवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अधिक माहिती की, विपुल रविंद्र सोनवणे (वय-२०) रा. पथराळे ता.यावल हा १३ जुन २०१९ रोजी जळगावातील रिंगरोडवरील हरेश्वर नगर येथून कोणालाही न सांगता बेपत्ता झाला होता. मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती वडील रविंद्र सोनवणे यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात माहिती दिली. रविंद्र सोनवणे यांच्या खबरीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. पोलीसांत नोंद झाल्यानंतर मुलाचा शोध घेणे सुरू होते. दरम्यान, बेपत्ता तरूण हा गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे कामाला असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीसांना मिळाली. २८ नोव्हेंबर रोजी जिल्हा पेठ पोलीसांनी अंकलेश्वर येथे जावून विपुल सोनवणे याला ताब्यात घेतले. आज विपुलचा मोठा भाऊ दिपक सोनवणे याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर पवार, पो.ना. अजित पाटील, पो.ना. फिरोज तडवी, तपासी अंमलदार पो.ना. प्रविण भोसले यांनी कामगिरी केली.