Home क्राईम गेंदालाल मिल परिसरातून ३० हजार रूपयांचे भंगाराची चोरी; शहर पोलीसात गुन्हा

गेंदालाल मिल परिसरातून ३० हजार रूपयांचे भंगाराची चोरी; शहर पोलीसात गुन्हा

0
49

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात असलेल्या भंगाराच्या दुकानाच्या मोकळ्या जागेतून ३० हजार रूपये किंमतीचे भंगार लंपास केल्याच उघडकीस आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहनाज गुलबा खान (वय-३९) रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव यांचे गेंदालाल मिल भागातील मनपा कार्यालयाच्या बाजुलाच मुस्कान स्क्रॅप नावाचे भंगाराचे दुकान आहे. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद केले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ३० हजार रूपये किंमतीचे ३ क्विंटल वायरचे तुकडे, बारीक तांब्याची तार असलेले भंगार चोरून नेल्याचे २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. दिपक सोनवणे करीत आहे.


Protected Content

Play sound