Home राज्य वरळीजवळ समुद्रात बोट बुडाली ; एक जण बेपत्ता

वरळीजवळ समुद्रात बोट बुडाली ; एक जण बेपत्ता


मुंबई (वृत्तसेवा) मुंबईतील वरळी समुद्रात बोट बुडाल्याचे वृत्त आहे. या घटनेत सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून एकजण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रवाशाचा हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे.

मुंबईतील वरळी समुद्रात दुपारी रेवती नावाची बोट बुडाल्याची घटना घडली. या घटनेत बोटीतील एक प्रवासी बेपत्ता असल्याचे समजते. तसेच, घटनास्थळी दाखल झालेल्या तटरक्षक दलाच्या जवानांनी सहा ते सात प्रवाशांना वाचविले आहे. सर्व जण सुरक्षित असून, त्यांना प्रथमोपचार देण्यात आले. या दुर्घटनेत एक प्रवासी बेपत्ता झाला आहे. तटरक्षक दलाच्या दोन बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound