Home Cities यावल यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी विनोद पाटील

यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी विनोद पाटील

0
37


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कासवे येथील सामाजीक कार्यकर्ते विनोद पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. 

राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचे तालुका अध्यक्ष व नगरसेवक प्रा. मुकेश येवले यांनी तालुक्यात गाव तिथ शाखा गावात पवारसाहेबांचे विचार पोहचण्यासाठीचे उदीष्ट समोर ठेवुन तालुक्यात दौरे सुरू केले आहेत. दरम्यान त्यांनी यावल तालुक्यातील कासवे येथील विनोद पाटील यांची तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.

विनोद पाटील यांना निवडीचे पत्र प्रा. मुकेश येवले यांनी दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाच्या आदीवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष एम.बी. तडवी, नाना बोदडे, ओ .बी.सी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे, अरूण लोखंडे, हेमंत येवले, कामराज घारू, गनी खान, हितेश गजरे, किशोर माळी, बापु जासुद आदी पदाधिकारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.


Protected Content

Play sound