Home Cities पाचोरा नगरदेवळा येथे शांतीगीरी महाराजांचा भव्य सत्कार

नगरदेवळा येथे शांतीगीरी महाराजांचा भव्य सत्कार


पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथे शांतीगिरी महाराज यांचा संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या कुटियावर सत्कार करण्यात आला.

विश्र्वशांती धर्म जपानुष्ठान  सोहळा १९ ते २६ डिसेंबर दरम्यान श्री. क्षेत्र वेरुळ जि. औरंगाबाद व ओझर आश्रम जि. नासिक येथे होत आहे. त्या अनुषंगाने महामंडलेश्वर श्री. शांतीगिरी महाराज यांचा दौरा २३ रोजी दुपारी तीन वाजता संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या कुटियावर भक्त गणांसमवेत नगरदेवळा येथे संपन्न झाला. सदर सोहळ्याची माहिती भक्तांना देण्यात आली होती. त्या प्रमाणे सर्व गुरु बंधुंनी तन मन धनाने सहकार्य करुन कार्यक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. भक्त गणातर्फे १३ किलो वजनाचा शेवंती व झेंडुच्या फुलांचा हाराने श्री. शांतीगिरी महाराजांचे पुजन करण्यात आले. तसेच ॐ जनार्दनाय नमः च्या स्वराने परिसर दुमदुमला होता. कुमारीकांनी डोक्यावर कलश घेत तर महिलांनी फुगड्या खेळत बाबाजींचे स्वागत केले. कार्यक्रमास‌ नगरदेवळा सह परिसरातील भक्तगण उपस्थित होते.


Protected Content

Play sound