Home क्राईम शिवाजी नगरातील शेतकऱ्याची १ लाख ३० हजारात फसवणूक

शिवाजी नगरातील शेतकऱ्याची १ लाख ३० हजारात फसवणूक

0
103

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरात राहणाऱ्या शेतकऱ्याची स्वराज-४४७ ट्रॅक्टर अवघ्या १ लाख ३० हजारात विक्री होत असल्याची भुरळ पडल्याने फसवणूक केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक विश्वनाथ बारसे (वय-५०) रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ शिवाजी नगर हे शेतकरी आहेत. शेतीच्या कामासाठी त्यांना ट्रक्टरची आवश्यकता असल्याने त्यांचा मित्र धनराज भगवान करे रा. जळका ता.जि.जळगाव यांच्या ओलक्स ॲपवर दाखविलेल्या ट्रक्टर अशोकसिंग गुजर यांचे असल्याचे समजले. दोघांनी नंतर ओएलएक्सच्या साईटवर जावून त्यांची संपुर्ण माहिती संकलीत केली. अशोक सिंग गुर्जर नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करुन बोलणी झाली. त्यानुसार अर्धी रक्कम अगोदर दिल्यावर ट्रॅक्टर देतो, त्याच दिवशी उर्वरीत रक्कम द्यावी असे तोडी बोलणीत ठरले होते. त्यानुसार बारसे यांनी १६ नाहेंबरला व लगेच दुसऱ्या दिवशी १७ नाहेंबर ला नरेश कुमार याचे कॅनरा बँक खात्यावर आणि हनुमंत गायकवाड याच्या खत्यावर दानाबाजार शाखेच्या स्टेटबँकेतून ऑनलाईन पद्धतीने १ लाख ३० हजार रुपये वर्ग केले. बोलणी झाल्यानंतरही अशोक सिंग नावाच्या व्यक्तीने ट्रॅक्टर देण्यास नकार देत उडवा उडवीची उत्तरे देत टाळून लावले. फसवणुक झाल्याचे निष्पन्न होताच अशोक सींग गुर्जर विरोधात शहर पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि. भिमराव नादुरकर करीत आहे.


Protected Content

Play sound