Home क्राईम चाळीसगावात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

चाळीसगावात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

0
85

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील करजगाव येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना आज पोलीस प्रशासनाने धाड टाकून उद्ध्वस्त केला.

याबाबत वृत्तांत असा की, सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय बोकाळल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच गांजा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. आता या पाठोपाठ करजगाव येथे बनावट दारू तयार करणार्‍या कारखान्यावर आज सकाळी कारवाई करण्यात आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. येथून पोलिसांना नकली दारू बनविण्यासाठी आवश्यक असणार्‍या रसायनासह अन्य सामग्री जप्त केली असून याचे मूल्य २ लाख ६५० रूपये आहे. हा कारखाना एक राजकीय वरदहस्त असणारा पुढारी चालवत असल्याची माहिती समोर आली असून याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound