जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर दिवाळी सणानिमित्त नोव्हेंबर महिन्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति कुटुंब एक किलो साखर २० रुपये दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी केले आहे.
प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति कुटुंब एक किलो साखर २० रुपये दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यानुसार जिल्ह्यातील ४ लाख ७० हजार ९५० कुटुंबांकरीता ४ हजार ७३० क्विंटल साखर नियतन मंजुर करण्यात आले आहे. ही साखर तहसिलदार यांचेमार्फत जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन १ किलो साखर २० रुपये दराने घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.