लग्न फसवणुक प्रकरणी नवविवाहितेसह नातेवाईकांना अटक

यावल प्रतिनिधी । येथील शेतमजुराशी लग्न लावुन घरातुन पोबारा केलेली नवविवाहीत तरूणी व तिची मावशीसह मध्यस्थी करणाऱ्यास पोलीसांनी अटक केली असुन आज या प्रकरणी आरोपींना न्यायलयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

यावल शहरातील महाजन गल्लीतील राहणारे डिंगबर देवीदास फेगडे या तरूणाशी दिनांक ७ / ११ / २० रोजी लग्न लावुन ९४ हजार रुपयात फसवणुक केल्या प्रकरणी डिंगबर फेगडे यांच्या तक्रारी वरून पोलीसात गुन्हा करण्यात आला होता . दरम्यान यावल पोलीसांनी लग्नासाठी मध्यस्थी असलेला अनिल परदेशी, नवविवाहीत तरूणी सोनाली कु्ऱ्हाडे आणी तिची मावशी बहीणाबाई रावसाहेब अंबुरे यांना पोलीसांनी तात्काळ अटक केली असुन या सर्व आरोपींना आज यावल न्यायलयात हजर केले असता न्यायधिशांनी त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नेताजी वंजारी हे करीत आहे .

 

Protected Content