मुंबई : वृत्तसंस्था । एका चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या कस्तूरबा मार्ग पोलीस स्थानकात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवघ्या तीन वर्षांच्या एका चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.