शिमला : वृत्तसंस्था ।हिमाचल प्रदेशमधील लाहौल खोऱ्यातील थोरांग गावातील ५२ वर्षीय भूषण ठाकूर या एकमेव नागरिकाचा कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. पूर्ण गावच कोरोना पॉजिटीव्ह ठरले आहे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लाहौल-स्पिती हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक करोनाबाधितांचा जिल्हा ठरला आहे.
लाहौलमध्ये बाधितांच्या संख्येत अचानक मोठ्या संख्येने वाढ झाल्याने स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनि पर्यटकांना देण्यास बंदी घातली आहे. रोहतांग बोगद्याच्या उत्तरेकडील बाजूस हा सर्व प्रदेश आहे. हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
मनाली आणि लेह महामार्गावरील थोरांग गावची लोकसंख्या केवळ ४२ इतकी आहे. हिवाळा सुरु असल्याने अनेकजण कुलूला स्थलांतरित झाले आहेत. या भागामध्ये पर्यटकांची संख्या वाढल्याने गावातील सर्वच नागरिकांनी चाचणी करण्याचा निर्णय घेतला आणि चाचणीचा निकाल पाहून स्थानिक प्रशासनालाही धक्का बसला. गावातील ४२ पैकी ४१ जणांच्या करोना चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आला आहे.
“मी मागील चार दिवसांपासून एका वेगळ्या खोलीमध्ये राहत असून माझं जेवण मीच बनवत आहे. चाचणीचे निकाल येण्याआधी आम्ही सर्व कुटुंबिय एकत्रच राहत होते. मी सॅनिटायझेशन, हात वारंवार धुणे, मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या सर्व नियमांचे कडेकोटपणे पालन करत होतो. लोकांनी साथीला हलक्यात घेऊ नये. हिवाळ्यामध्ये तर लोकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे,” असं मत भूषण ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. भूषण यांच्या कुटुंबातील पाच जणांना लागण झाल्याने भूषणच क्वारंटाइन झाल्याप्रमाणे एकटे राहत आहेत.
एका धार्मिक कार्यक्रमासाठी गावातील सर्व लोक एकत्र आले होते. त्यामुळेच गावातील सर्वांना सामुहिक संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे.