Home क्राईम नागरीकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी : जळगाव पोलीस

नागरीकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी : जळगाव पोलीस



जळगाव (प्रतिनिधी) शहरात नुकतेच ‘मध्य प्रदेश उत्सव’ नावाने भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात एका ग्राहकाला ९१ हजाराचा गंडा घालण्यात आला होता. त्या अनुशंगाने नागरीकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी असा सल्ला पोलिसांनी पत्रकान्वये दिला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या जुन्या वस्तु विक्रीसाठी वेबसाईट सुरू झाल्या आहेत. यात ग्राहकाने वस्तू पसंत केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्याची विनंती केली जाते. एकदा पेमेंट झाले ही संबधित व्यक्ती फोन उचलत नाही किंवा फोन बंद असतो. अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक केली जात असते. तसेच सैन्य, एअरफोर्स, सीआयएफएस आदी विभागातील अधिकाऱ्यांचे गणवेश परिधान करून वेबसाईटवर फोटो टाकले जात आहेत. या विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमीष दिले जात आहेत. पैसे भरल्यानंतर फसवणूक केली जाते आहे. अशी अनेक प्रकरणे सध्या सायबर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आली आहेत. त्यामुळे नागरीकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी असे सायबर पोलिस ठाण्यातर्फे कळवण्यात आले आहे. दरम्यान, शहरात ‘मध्य प्रदेश उत्सव’ नावाने भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात ग्राहकाने ऑनलाइन पेमेंट देण्यासाठी एटीएम कार्ड दिले होते. कर्मचारी व मॅनेजरने मिळून सबंधित ग्राहकाची माहिती मॉडिफाय करुन त्याला ९१ हजार रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणी सायबर पोलिसांनी कर्मचाऱ्यास शनिवारी अटक होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound