Home Cities जळगाव माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोना झाल्याचे निदान

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोना झाल्याचे निदान


जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोना झाल्याचे निदान आज झाले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव उचांकी असताना एकनाथाराव खडसे सामूहिक कार्यक्रमांपासून दूर होते. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेपासून ते प्रवेश आणि नंतर काही दिवस सततच्या संपर्क भेटींमुळे ते विविध ठिकाणी फिरले आणि अनेक लोकांच्या संपर्कात आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना कोरोना झाल्याचे निदान झाल्यापासून ते घरातच थांबलेले होते.

२ दिवसांपासून त्यांना त्रास जाणवायला लागल्यापासून त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली आणि ती पॉजिटीव्ह आल्याचे आज सांगण्यात आले आता पुढच्या काळात डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांचे फिरणे आणि लोकांना भेटणे सुरु होऊ शकेल असे त्यांच्या निकट्वर्तिय्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound