Home धर्म-समाज यावल येथे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली

यावल येथे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली

0
35

यावल प्रतिनिधी । येथील शिवसेनेच्या वतीने हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त आज भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. 

यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जे.टी. महाजन व्यापारी संकलनातील शिवसेना संपर्क कार्यालयात आज यावल तालुका शिवसेना शाखेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार (मुन्ना) पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली. 

या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवी सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, सेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, आदीवासी सेनेचे तालुकाप्रमुख हुसैन तडवी, शरद कोळी, मोहसीन खान, अजहर खाटीक, संतोष खर्चे, प्रकाश धोबी, योगेश चौधरी, सागर देवांग, पप्पु जोशी, योगेश पाटील, विजय कुंभार, अनिल पाटील, बाळासाहेब निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी कार्यक्रमास उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound