Home क्राईम साखरपुडयाच्या पार्टीसाठी बोलवून हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार

साखरपुडयाच्या पार्टीसाठी बोलवून हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार


 

 

मुंबई : वृत्तसंस्था । साखरपुडयाच्या पार्टीसाठी बोलवून मित्रांनीच मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना . अंधेरी-कुर्ला रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली. पीडित तरुणीने १५ नोव्हेंबरला तीन आरोपींविरोधात तक्रार नोंदवली.
आरोपींनी आपल्याला व अन्य दोन महिलांना पार्टीसाठी निमंत्रित केले होते. तीन आरोपींपैकी एकाने त्याच्या साखरपु़डयाच्या निमित्ताने आठ नोव्हेंबरला ही पार्टी आयोजित केली होती मुख्य आरोपीने तिला दारु पिण्यासाठी जबरदस्ती केली. पार्टीला आलेल्या अन्य दोन मैत्रिणी थोडयावेळाने तिथून निघून गेल्या. पण मुख्य आरोपी आणि दोन मित्र तिथेच थांबले होते. त्यांनी हॉटेलमधल्या खोलीत बलात्कार केला.

पीडित महिला घरी पोहोचल्यानंतर तिने लगेच याबद्दल कुटुंबीयांना काही सांगितले नाही. पण अखेर हिम्मत करुन शनिवारी कुटुंबीयांना तिच्यासोबत काय घडले ते सांगितले.

तक्रार नंतर सहार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. कारण गुन्हा घडला, ते हॉटेल सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. “आरोपी फारर असून आम्ही लवकरच त्यांना अटक करु. वैद्यकीय तपासणीसाठी पीडित महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आले. आम्ही रिपोर्टची वाट पाहत आहोत” असे सहार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.


Protected Content

Play sound