Home Cities जळगाव ध्वजारोहण करून सहकार सप्ताहास प्रारंभ

ध्वजारोहण करून सहकार सप्ताहास प्रारंभ

0
104

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी बोर्डातर्फे सहकार सप्ताहास प्रारंभ करण्यात आला असून याच्या प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ (पुणे) अंतर्गत जळगाव जिल्हा सहकारी बोर्डातर्फे सहकार प्रशिक्षण केंद्र येथे ६७ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण केंद्रात या सप्ताहाचे उद्गाटन करण्यात आले. या अनुषंगाने सहकारी बोर्ड प्रशिक्षण केंद्रात बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याहस्ते सहकार ध्वजारोहण करून सप्ताहाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक डॉ. वसंतराव देशमुख, किरण साळुंखे, प्रमोद पाटील उपस्थित होते.

सुदाम पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य व्ही. बी. चौधरी यांनी सहकार सप्ताहाची रूपरेषा सादर केली. बोर्डाचे संचालक प्रा. मनोहर संदानशिव, राजेंद्र पवार, जी. एस. साळुंखे, जितेंद्र सुर्वे उपस्थित होते.


Protected Content

Play sound