Home Cities जळगाव जिल्हा काँग्रेस भवनात पंडीत जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

जिल्हा काँग्रेस भवनात पंडीत जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस भवनात पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या निमित्ताने जिल्हा कार्यालयात प्रा. पाटील आणि प्रा. भारंबे यांनी व्याख्यान दिले. यावेळी कार्यक्रमाला होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात स्व. पंडितजी नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पूण करून आदरांजली अपर्ण करण्यात आली. कार्यक्रमात स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बापूसाहेब पाटील, सुरेश पाटील, जमील शेख, देवेंद्र मराठे, परवेज खान, ग्रामीण कॉग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, शाम तायडे, बाबा देशमुख, सद्दाम शाह, घोडेस्वार , आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


Protected Content

Play sound