Home Cities जळगाव माध्यम छायाचित्रकार वसीम खान यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश! (व्हिडिओ)

माध्यम छायाचित्रकार वसीम खान यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश! (व्हिडिओ)

0
32

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सामाजिक कार्यकर्ते, युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे पदाधिकारी तथा माध्यम छायाचित्रकार वसीम खान यांनी कार्यकर्त्यांसह शुक्रवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.

माध्यम छायाचित्रकार वसीम खान व कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला महानगरप्रमुख शरद तायडे, अल्पसंख्याक महानगराध्यक्ष जाकीर पठाण, उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, शिवसेना वाहतूक सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष अश्फाक शाह, विभाग प्रमुख जब्बार शेख आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. वसीम खान यांना शिवसेना अल्पसंख्याक आघाडी उपमहानगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी, पदाधिकारी जकी अहमद, उमेश चौधरी, मयूर विसावे, इम्रान खान, आदिल खान, अझर खान, फिरोज माया, तस्लिम सैय्यद, फिरोज खान, निखिल सोनार, शाकिर खाटीक, अर्शद सैय्यद, योगेश चौधरी, शाहरुख खान, जय सपकाळे, दानिश शेख, ललित पांडे, शाहिद खान, राजा टेलर आदींनी अभिनंदन केले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1769505256540658/

 


Protected Content

Play sound