Home राजकीय रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार भागीदार

रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार भागीदार


 

मुंबई : वृत्तसंस्था । रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध आहे,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला

आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

“दिवंगत अन्वय नाईक आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहारामध्ये आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली.असेही ते म्हणाले .

“अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडलेलं नाही. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे,” असंही सावंत यांनी नमूद केलं.


Protected Content

Play sound