जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बी.जे.मार्केट परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा उद्घाटन आज गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. यावेळी नवीन शाखा कार्यकारीणीही जाहीर करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष आभिषेक पाटील म्हणाले की, जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड जोमात सुरू आहे व या घोडदौडीचा आपण एक भाग आहोत याचा मनस्वी आनंद होतोय. यावेळी अनेक युवकांनी शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, महानगर सचिव अँड.कुणाल पवार, शाखा अध्यक्ष रोहित सोनवणे, शाखा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव नरेंद्र सपकाळे तसेच महानगरचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.