भुसावळ प्रतिनिधी । जिल्ह्यातील पारोळा पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनची मोटारसायकल नाहाटा महाविद्यालयाजवळ रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना ती सार्वजनिक ठिकाणी लावलेली मिळून आली असून ती भु.बा. पो.स्टेशनला जमा केली.
याबाबत अधिक महिती अशी की, जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पोलीस प्रशासन आरोपींचा शोध घेत आहे. तसेच मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी वेगवेगळ्या मोहीम राबवित आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारी मोटारसायकल चालविण्याऱ्यांची कसून चौकशी करीत आहे. या दरम्यान चोरीच्या मोटरसायकल ही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे स.फौ.तस्लिम पठाण, पोहेकॉ मिलिंद कंक हे रात्रीची पेट्रोलिंग गस्त करीत असतांना नहाटा कॉलेज जवळ सार्वजनिक जागेवर बेवारस अवस्थेत एक मोटारसायकल मिळून आली. त्या मोटारसायकलच्या मालकाचा शोध घेतले असता ती पारोळा पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली. भुसावळ पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे चोरी गेलेली मोटारसायकल मिळून आली. तिला पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली असून भुसावळ बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून पारोळा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली आहे, अशी माहिती पोहेकॉ मिलिंद कंक यांनी दिली.