प्रशिक्षण केंद्राचे आमिष दाखवत महिलेची ९४ लाखात फसवणूक; संशयिताला पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । निती आयोगाचे बनावट कागदपत्रे दाखवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे आमिष दाखवत जळगावातील एका व्यवसायिक महिलेला तब्बल ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला रविवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता पोलीसांनी अटक केली. आज सोमवारी ६ सप्टेंबर रोजी न्यायालयाने आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अविनाश अर्जून कळमकर (वय-३३) रा. दैठणे गुंजाळ ता. पारनेर जि. अहमदनगर असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. 

सविस्तर माहिती अशी की, योगीता उमेश मालवी (वय-३८) रा. दांडेकर नगर पिंप्राळा हे खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. व्यवसाय करत असल्याने त्यांची अविनाश अर्जून कडमकर रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांच्याशी डिसेंबर २०१८ मध्ये ओळख झाली. कळमकर यांनी मायभुमी ग्रामविकास संस्था स्थापन करून अविनाश अर्जून कळमकर, प्रिती विनायक खवले, प्रमिला अर्जून कळमकर, कांचन दादाभाऊ दंगे, शिवराम आप्पाजी जासूद, संगिता शिवराम जासूद, अर्जून माधवराव सर्व रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांनी संस्थेचे निती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवून व बनावट नोंदणी प्रमाणपत्र योगीत मालवी यांना दाखविले आणि प्रशिक्षण केंद्रांतर्गत बचत गटासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार मालवी यांना बनावट खाते क्रमांक पाठविले.  त्यानुसार योगीता मालवी यांच्याकडून वेळोवेळी १५ जानेवारीपर्यंत बनावट खात्यावर सुमारे ९४ लाख १४ हजार ८५३ रूपये मागवून घेतले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगीत मालवी यांनी शनिवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात वरील सात जणांसह इतर अनोळखी ३ जण असे एकुण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर रामानंद नगर पोलीसांनी मुख्य संशयित आरोपी अविनाश कळमकर याला नगर येथून रविवारी रात्री ८ वाजता अटक केली. आज सोमवार ६ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोउनि संदीप पाटील करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!