कर्नाटकात भीषण अपघात; 9 जण जागीच ठार

accident beed

 

विजापूर (वृत्तसंस्था) गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. आज पहाटे हा अपघात झाला असून या अपघातात नऊ जण जागीच ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. क्रूझर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला.

 

सिंदगी परिसरातील आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात क्रूझरमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 20 ते 30 वयोगटातील तरुणांचा मृतांमध्ये समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले पर्यटक हे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील रहिवासी होते.

Add Comment

Protected Content