राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात : खासदार निंबाळकर

IMG 20190325 WA0676

सोलापूर (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ९ आमदार आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खळबळ उडवून दिली आहे.

 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सत्ता स्थापनेसाठी जे करावं लागतं, ते सर्व करू अशा शब्दात फोडाफोडीचे स्पष्ट संकेत दिले होता. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत माझ्या संपर्कात जवळपास ९ आमदार आहेत. परंतू नावं देऊ शकत नाही,असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे नऊ आमदार कोण? अशी एकच चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच यामुळे सत्ता स्थापनेसाठी आता राज्यात घोडेबाजार होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Protected Content