फैजपूर प्रतिनिधी । जलशक्ती अभियान अंतर्गत नुकतीच रावेर आणि यावल तालुक्यांची निवड करण्यात आली असून या कामांसाठी ९ कोटी ७ लक्ष ८५ हजार रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे जलशक्ती अभियानाच्या माध्यमांसह लोकसहभागाने हे काम करण्यात येणार आहे. रावेर आणि यावल तालूक्यात होणा-या कामांना साधारण ९०७.८५ (९ कोटी ७ लक्ष ८५ हजार ) लक्ष इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या निधीतून नाला खोलीकरण, बंधारा दुरुस्ती करणे, ग्याबियन बंधारा बांधणे, सा.बा.दुरुस्ती करणे, साठवण बंधारा बांधणे-दुरुस्ती करणे, सिमेंट नाला बांधणे अश्या प्रकारची विविध कामे करण्यात येणार आहे. तसेच पावसाचे पाणी वाया न जाता पावसाचे पाणी हे मुरुन पाण्याची पातळी वाढण्यास या माध्यमातून मदत होणार असल्याची माहिती ना. हरिभाऊ जावळे यांनी दिली आहे.
या निर्णयाने रावेर यावल तालुक्यातील पाणी पातळी वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.