तब्बत आठ महिन्यानंतर नववी ते बारावीपर्यंतच्या जिल्ह्यातील ८६६ शाळा सुरू (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज तब्बल आठ महिन्यानंतर नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या. पालकांच्या संमतीनुसार जिल्हाभरातील एकूण शाळांपैकी ८६६ शाळा मंगळवार, ८ डिसेंबरपासून कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत सुरु झाल्या. शेतकर्‍यांच्या आंदोलना पाठींबा म्हणून जिल्हा बंद आणि शाळेचा पहिला दिवस यामुळे शाळांमध्ये नियमित विद्यार्थी संख्येपेक्षा विद्यार्थ्यांची फारच कमी उपस्थिती असल्याचे दिसून आले. 

शहरासह जिल्हाभरातील विविध ठिकाणची शाळांची शिक्षणाधिकार्‍यांनी पाहणी  केली. यात सर्वत्र शंभर टक्के नियमांचे पालन करण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी बोलतांना दिली.

कोरोना व लॉकडाऊमुळ गेल्या आठ महिन्यांपासून प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद असून ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शासनाने लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत सुरु करण्याचे आदेश शासनाने पारित केले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तसेच शाळा निर्जंतुकीरण करण्यात आल्या होत्या. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही शिक्षण विभागाच्या तयारीचा आढावा घेतला होता. पालकांनी दिलेल्या समंतीपत्रानुसार मंगळवार 8 डिसेंबर रोजी नववी ते बारावी पर्यंतच्या जिल्ह्यातील 866 शाळा सुरू झाल्या. यात जळगाव ग्रामीण मधील 43 शाळांचा समावेश आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिली. शहरातील कोरोनाचे नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याबाबत शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी पाहणी केली. पाहणीत कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात असल्याचे दिसून आले.

केसीई संचलित सीबीएसी स्कूलमध्ये शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी पांढर्‍या रंगाचे सर्कल आखण्यात होते. तर तसेच सॅनिटर, थर्मल स्कॅनिंग, ऑक्सीमीटर यापध्दतीने विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या शाळेत एकूण 13 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, असे प्राचार्य सुष्मा कंची यांनी सांगितले. 9 ते 12 या वेळेत विद्यार्थ्यांचे वेळापत्रकानुसार शाळेचा पहिला दिवस पार पडला. तर ए.टी.झांबरे विद्यालयातही गेटवरच विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येवून त्यांना सोडण्यात आले. 12 ते 5 या वेळेत याठिकाणी वेळापत्रकानुसार दिवस पार पडला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था ही कोरोनाचे नियमांचे पालन करत करण्यात आली होती. एका बेंचवर एकच विद्यार्थी तसेच एक बेंच सोडून दुसरा विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याचे दिसून आले. मंगळवारी शाळेचा पहिला दिवस होता. तर दुसरीकडे जिल्हा बंद असल्याने अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कमी अशी उपस्थिती होती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/680315746205749

Protected Content