जामनेर (प्रतिनिधी) येथील श्री ज्ञानगंगा बहुउद्देशीय प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी. बोर्ड शालांत परीक्षेचा निकाल 85 टक्के टक्के लागला आहे. तर विद्यालयातून योगेश हरी पाटील हा विद्यार्थी 73.60 टक्के गुण मिळवीत प्रथम आलाय.
विद्यालयातून द्वितीय क्रमांकाने वाघ दिनेश अशोक 73 टक्के मिळवून उत्तीर्ण झाला आहे. तर तृतीय क्रमांकाने शिंदे वैष्णवी बाबुराव ही विद्यार्थिनी 67 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालीय. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन (महाराष्ट्र राज्य) तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी व विद्यालयाचे प्राचार्य आर. जे. सोनवणे व सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.