Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज ८३८ बाधित रूग्ण आढळले; ७५२ रूग्ण झाले बरे...

कोरोना : जिल्ह्यात आज ८३८ बाधित रूग्ण आढळले; ७५२ रूग्ण झाले बरे !


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ८३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ७५२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह चोपडा आणि चाळीसगाव तालुक्यातील संसर्ग वाढलेला दिसून येत आहे. 

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-१०६, जळगाव ग्रामीण-२१, भुसावळ-६८, अमळनेर-७, चोपडा-१३६, पाचोरा-५८, भडगाव-४, धरणगाव-१६, यावल-२८, एरंडोल-५५, जामनेर-३५, रावेर-३१, पारोळा-१८, चाळीसगाव-११८, मुक्ताईनगर-८७, बोदवड-३७ आणि इतर जिल्ह्यातील १३ असे एकुण ८३८ रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख २९ हजार ८८७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख १७ हजार ७४६ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे तर ९ हजार ८०४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १७ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 


Protected Content

Play sound