दिल्ली वृत्तसंस्था | एका अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला असून त्यानुसार पाकिस्तानातील अत्याचाराला कंटाळून भारतीय नागरिकत्वासाठी सातत्याने अर्ज करत असलेल्या ८०० पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व न मिळाल्याने त्यांना पाकिस्तानात परतावे लागल्याचे सांगण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, “द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भारतातील पाकिस्तानी अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या सीमांत लोक संघटनेने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. या अहवालात सांगण्यात येत आहे की, भारतातील नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या ८०० हिंदूंनी पाकिस्तानात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे, कारण त्यांच्या नागरिकत्वाच्या बाबतीत प्रकरण पुढे जात नव्हते आणि कोणतेही ठोस उत्तर देखील दिले जात नव्हते. या वृत्तानुसार, सीमा लोक संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंग सोढा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, जेव्हा हे सर्व हिंदू पाकिस्तानात पोहोचले, तेव्हा त्यांचा भारताविरुद्ध अपप्रचार करण्यासाठी वापर करण्यात आला. या सर्वांची प्रसारमाध्यमांसमोर परेड करण्यात आली आणि त्यांना जबरदस्तीने भारतात वाईट वागणूक मिळत असल्याचे माध्यमांना सांगा म्हणून सांगण्यात आले.
केंद्रीय गृह मंत्रालयाने वर्ष २०१८ मध्ये भारतीय नागरिकत्व हवी असणाऱ्यांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू असून त्याच्या मदतीने शेजारील देशांमध्ये छळ होत असलेले लोक भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात.