जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील हाजी अहमद नगर परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय तरुणाला ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन तब्बल ८ लाख २२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद शोएब रफिक वय-३९, रा. हाजी अहमद नगर जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून तो नोकरीला आहे.. दरम्यान 29 फेब्रुवारी 2024 ते 4 मे 2024 च्या दरम्यान त्यांना एका नंबर वरून फोन आला ल. रमेशचंद्र भुतडा असे नाव सांगून त्यांनी provex कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांची वेळोवेळी तब्बल ८ लाख २२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान त्यांची फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर मोहम्मद शोएब रफिक यांनी शुक्रवारी 28 जून रोजी दुपारी 12 वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात भाव घेतली व तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करत आहे.