जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 7 हजार 337 प्रकरणे निकाली

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव जिल्हा न्यायालयात शनिवारी 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते यात न्यायालयातील प्रलंबित व वाद पूर्व कशी एकूण ७ हजार ३३७ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे.

जळगाव जिल्हा न्यायालयात शनिवारी 27 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित व वादपूर्व असे प्रकरणे निकाले काढण्यात आले. त्या माध्यमातून एकूण 32 कोटी 27 लाख 96 हजार 759 रुपये वसूल करण्यात आले आहे. शिवाय 22 जुलै ते 26 जुलै दरम्यान राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्हमध्ये एकूण 572 प्रकरणे निकाली काढण्यात आले. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख एम.क्यू.एस.एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी न्या. एस एन राजुरकर, न्या. एस पी सय्यद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.पी. सय्यद, जिल्हा वकील संघाचे एडवोकेट रमाकांत पाटील, उपाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी. काबरा, न्या.एस आर.एल.भांगडिया, न्या. एस एन मोरवाले, न्या. एनजी देशपांडे, न्या.एस.एस. परदेशी, न्या. श्रीमती जे एस केळकर, न्यायमूर्ती श्रीमती एस.व्ही. मोरे, न्या. श्रीमती डी.जे. सरनायक यांच्यासह अडवोकेट शितल राठी, पल्लवी जोशी, दीपक वाघ, रामकृष्ण कापुरे, शिरीन शेख यांनी सहकार्य केले.

Protected Content