जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत चाळीसगाव येथील सेवानिवृत्त वृध्दाची ५८ लाख ९५ हजार ३५१ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गुरूवारी १८ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील डीवायएसपी परिसरात ५९ वर्षीय व्यक्ती हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते महावितरण कंपनीतून निवृत्त झाले आहे. त्यांना १५ जानेवारी रोजी त्यांना कॅथरिन मॅकवेल नावाच्या संस्थेच्या माध्यमातून शेअर ट्रेंडींगचे आमिष दखवत त्यांना वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपला जॉईन करून घेण्यात आले. त्यांना एक लिंक पाठवून गुंतवणूक केल्यास त्यांना अधिकचा नफा होणार असल्याचे अमिष दाखविले. त्यानुसार निवृत्ताने १५ जानेवारी ते १९ मार्च दरम्यान वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने ५८ लाख ९५ हजार ३५१ रुपये भरले. रक्कम भरल्यानंतरही नफा मिळत नसल्याने व मुद्दलही गेल्याने आपली फसवणूक झाल्याची निवृत्ताची खात्री झाली. अखेर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुरूवारी १८ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.