धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावात बंद घर फोडून फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावात रमेश सिताराम बडगुजर (वय-६३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १५ जुलै रात्री ९ ते १७ जुलै सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. दरम्यान अज्ञात चोट्याने बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकिला आल्यानंतर रमेश बडगुजर यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू पाटील करीत आहे.