भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खडका चौफुली येथील दुकान फोडून गल्ल्यातून ५० हजारांची रोकड लांबविल्याची घटना बुधवार ६ मार्च रोजी सकाळी पहाटे समोर आली. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमर युसुफ अली शाकीर वय-३४, रा. खडका चौफुली, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच भागात त्यांचे किराणा दुकान आहे. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुकान फोडून दुकानाच्या गल्ल्यातून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार बुधवार ६ मार्च रोजी पहाटे ४.३० वाजता उघडकीला आला. या संदर्भात दुकान मालक अमर युसूफ अली शाकीर यांनी सायंकाळी ७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ यासीन पिंजारी हे करीत आहे.