गिरी मढी देवस्थानासाठी ५० लाखाचा निधी मंजूर

सावदा प्रतिनिधी । गिरी मढीसाठी पायाभूत विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून भरीव निधी उपलब्ध व्हावा, यासाठी राजेश वानखेडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

येथील सोमवार गिरी मढी साठी पायाभूत विकास करणेकामी तीर्थक्षेत्र विकास निधी मधून भरीव निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून राजेश वानखेडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती सदर देवस्थान ठिकाणी परिसरातील जिल्ह्यातील व शेजारी असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील भाविकांची अलोट गर्दी होत असते त्या मंदिराचा भक्तांसाठी भक्त निवास व पायाभुत सुविधा प्राप्त करून मंदिराचे पावित्र्य जपले जावे याकरीता राजेश गजानन वानखेडे त्यांच्याकडे भक्तांनी केलेल्या मागणीवरून नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा विषय राजेश वानखेडे यांनी त्या ठिकाणी मांडला.

त्याबाबत बैठकीत पालकमंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा निवेदन देऊन मागणी केली होती. त्यानुसार परवा झालेल्या बैठकीमध्ये येथे भक्तनिवास सर्व समाधी स्थळ नूतनीकरण व संरक्षणभिंत करीता या कामावर 50 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर केले लवकरच या कामांचा प्रारंभ केला जाणार आहे.

त्याबाबत राजेश वानखेडे व सर्व भक्तांनी गुलाबराव पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानले. या मान्यता यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा मागणी पत्र देण्यात येऊन शिफारस केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या कामाला मान्यता भावीक भक्तांनी आनंद व्यक्त केला असुन समाधान लाभले आहे.

 

Protected Content