मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात २०२४ शैक्षणिक वर्षापासून पासून प्रत्येक मुलीला उच्च शिक्षण मोफत देण्यात येणार आहे, तसेच ज्या मुलीना शिक्षणासाठी वसतिगृह मिळत नाही, त्यांना दरमहा पाच हजार ३०० रुपये देण्यात येतील. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शासन शिक्षण, प्रवास, राहणे आणि भोजन मोफत देणार असे पालकमंत्री उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. कौ
शल्यपूर्ण शिक्षणामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर विविध देशांमध्ये नोकरीसाठी संधी मिळेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एका पदवीबरोबर दुसऱ्या विद्यापीठाची अथवा इतर देशातील विद्यापीठाची देखील पदवी घेता येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला बहुभाषिक होणे जरुरी असून त्यादृष्टीने सर्वांनी शिक्षण घेतल्यास भविष्य उज्वल असल्याचा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.